शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

टंचाईकृती आराखड्यात८ गावामधील २६ वाड्या

By admin | Updated: February 24, 2016 00:04 IST

राजापूर तालुका : २ लाख २० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित

राजापूर : आगामी काळात भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडून राजापूरचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये ८ गावांसह २६ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी २ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या गावांमध्ये ताम्हाणे गावातील चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, मोरोशीमधील तळेवाडी, मिरासवाडी, टेंबवाडी, गावकरवाडी, खरवतेतील धनगरवाडी, हसोळतर्फ सौंदळमधील कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, कारवलीतील विठ्ठलवाडी, गाववाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी, वरचीवाडी, दसवंतवाडी, झर्येतील पळसमकरवाडी, धनगरवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी, तळवडेतील बामणदेव धनगरवाडी, साखरीनाटेतील बलबले मोहल्ला यांचा समावेश आहे. या गावांसह अंतर्गत वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे, त्यासाठी २ लाख २० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेंतर्गत निवड झालेली पाच गावे व त्यामधील १८ वाड्या यांचादेखील संभाव्य पाणीटंचाईमध्ये समावेश करण्यात आल्याने जलशिवार योजनेतून जी कामे मार्गी लागली, असा जो डंका पिटला गेला, त्यालाच तडा गेला असल्याचे आता समोर आले आहे. भरमसाठ खर्च करूनही जलशिवारयुक्त योजनेची कोणती कामे मार्गी लागली, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत, तर जी गावे व वाड्या संभाव्य टंचाईत समावेश करण्यात आल्या आहेत. नेमके त्याच गावात किंवा त्या लगतच्या गावातच धरण प्रकल्प आहेत. ही बाबदेखील दुर्लक्षून चालणारी नाही. त्यामुळेच मागील एक दशकाच्या कालखंडात नेमकी हीच गावे व त्यामधील वाड्यांना दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, हेच वास्तव पुढे आले. (प्रतिनिधी) योजनेबाबत साशंकता : जलशिवार योजनेतील गावांचाही समावेश जिल्हा परिषदेकडून जलशिवार योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेतील गावांचा संभाव्य पाणीटंचाईत समावेश करण्यात आल्याने योजनेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.