शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

‘त्या’ पाच गावात अजूनही टंचाई

By admin | Updated: May 20, 2016 00:43 IST

राजापूर तालुका : दीड कोटींचा खर्च होऊनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

राजापूर : तालुक्यातील ५ गावांमध्ये सुमारे १ कोटी ५१ लाख रुपये खर्चाची ८५ कामे जलयुक्त शिवार योजनेतून झाली असल्याचे कृषी अधिकारी सांगत असतानाच दुसरीकडे त्या गावांमधील पाणीटंचाई कायम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. याबाबत संतप्त सदस्यांनी विविध सवाल उपस्थित करत संबंधित कृ षी विभागावर प्रश्नांची सरबत्ती केली.या मासिक सभेला अनेक खात्यांचे प्रमुख अनुपस्थितीत होते. तर काही अधिकारी विलंबाने सभागृहात दाखल झाले. याबाबत उपस्थित सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे मासिक बैठकीला अनुपस्थित रहाणाऱ्या व विलंबाने सभागृहात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपसभापती उमेश पराडकर यांनी यावेळी दिला.या मासिक सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कामाच्या आराखड्यावरुन अधिकारी वर्गातच एकवाक्यता नसल्याचे यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आले. शासनाच्या शेष फंडातून ११ लाखांची तरतूद होऊनदेखील अद्याप पाणी व्यवस्थेशी संबंधित कामे मार्गी लागलेली नसल्याची माहिती सदस्यांनी देत तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात अनेक नळपाणी योजना या अद्याप सुरुच झाल्या नसल्याची माहिती सदस्यांनी यावेळी दिली. अशा सर्व नळपाणी योजनांची तत्काळ चौकशी करा व दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दीपक नागले व शिवाजी रबसे यांनी केली.३० एप्रिलनंतर सर्व शिक्षकांच्या कामगिऱ्या रद्द केल्या गेल्या असून, जर जास्त पटसंख्या व कमी शिक्षक एखाद्या शाळेत असेल तरच कामगिरीवर काढले जाईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तर २० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या तालुक्यातील १७६ शाळांबाबतची माहिती शासनाला देण्यात आली असून, याबाबत अद्याप शासनाकडून कारवाई झालेली नाही, अशीही माहिती देण्यात आली. विद्यार्थी पटसंख्येवरुन वाद निर्माण करणाऱ्या जैतापूर - आगरवाडी व वाडाभराडे येथील मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले. कशेळी शाळा नं. ५ ला इयत्ता ७ वीचा वर्ग जोडण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.तालुक्यातील काही अंगणवाड्यांना अद्यापही विद्युत पुरवठा न दिल्याने या अंगणवाड्या बंद असल्याची माहिती मासिक सभेत पुढे आली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात पाच गावे निवडण्यात आली असून, त्यामध्ये ८५ कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये खरवते, झर्ये, ताम्हाणे, मोरोशी व कारवली या गावांमध्ये ही कामे झाली असून, त्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये खर्च झाला असल्याची माहिती कृ षी अधिकारी चंद्रामणी मेश्राम यांनी दिली तर दुसऱ्या टप्प्यात या योजनेंतर्गत तालुक्यात करक, तळवडे व जवळेथर या तीन गावांची निवड झाली आहे. त्यातील तळवडे व करक या गावात धरण प्रकल्प आहेत, मग ती गावे जलयुक्त शिवार योजनेत कशी? असे सवाल उपस्थित सदस्यांनी केला. पण त्यावर समर्पक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे राजापूर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (प्रतिनिधी)