शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:48 IST

सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले आहे.

ठळक मुद्देविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदानवन विभागाकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

देवरुख : सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले आहे.वाशी येथील ग्रामस्थ संतोष जाधव यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती देवरुख वन विभागाला दिली. देवरुखनजीकच्या माळवाशी येथे संदीप चाळके यांचे हिल पॉईंट हे हॉटेल आहे. या हॉटेलनजीक पाण्याची मोठी विहीर आहे.

नेहमीप्रमाणे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जाधव हे विहिरीजवळील पाण्याची मशीन सुरू करण्यासाठी गेले असता, विहिरीतील पाण्यात बिबट्या पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली.त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आर. सी. भवर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, शर्वरी कदम, संतोष कदम, दिनेश गुरव ६ वाजण्याच्या सुमाराला घटनास्थळी आले.

यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने साधारण ४० फूट खोल असणाऱ्या विहिरीत जाळी टाकून बिबट्याला विहिरीच्या काठावर सुखरुप आणले.दरम्यान, हा बिबट्या सावजाच्या शोधात असताना, त्याची झेप जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला.

हा बिबट्या मादी जातीचा आणि १ वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या बिबट्याला रात्री ७.३० वाजता विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर रात्री नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी