शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सॅटेलाईट टॅगिंग केलेले ‘वनश्री’ कासव संपर्कात, सहा महिन्यापूर्वी सोडले होते समुद्रात

By अरुण आडिवरेकर | Updated: August 23, 2022 18:35 IST

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग करुन कासवांना समुद्रात साेडण्यात आले

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सहा महिन्यापूर्वी सॅटेलाइट टॅगिंग करुन पाच कासवांना समुद्रात साेडण्यात आले हाेते. या पाच कासवांपैकी ‘वनश्री’ हे एकमेव कासव संपर्कात असून, अन्य चार कासव संपर्काबाहेर गेली आहेत. काही दिवसांपूर्वी संपर्क तुटलेले ‘रेवा’ हे चौथे कासव ठरले.कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासव अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कोठून येतात. याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग केलेली पाच कासवे समुद्रात सोडण्यात आली. त्यातील ‘लक्ष्मी’, ‘प्रथमा’, ‘रेवा’, ‘सावनी’ या चार कासवांचा विशिष्ठ अंतर प्रवास केल्यानंतर संपर्क तुटला.त्यानंतर ‘वनश्री’ एकमेव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपर्कात होती. ते मालवण किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात डुबकी घेत होते. ६ ऑगस्टला वनश्रीकडून सिग्नल मिळणे बंद झाले. ट्रान्समीटर निकामी झाल्यामुळे किंवा बॅटरी संपल्यामुळे संपर्क तुटल्याचा अंदाज अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे. ‘वनश्री’ कासव १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गुहागर येथून टॅग लावून सोडण्यात आले हाेते. हे कासव गोव्याच्या किनाऱ्यापासून १०० किलोमीटर अंतरावर कॉन्टिनेंटल शेल्फच्या काठावर होती. पाचपैकी ‘वनश्री’ कासवाचा प्रवास कोकण आणि गोवा किनारपट्टीच्या दरम्यान होता. त्या पलीकडे कुठेच ‘वनश्री’चा प्रवास झालेला नाही.दरम्यान, ‘प्रथमा’ कासव गुजरातला जाऊन माघारी परतले. यावरुन ती अतिखोल समुद्रात जात नसून खंडीय भागातच राहत असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग