शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंच निवडणुकीत सेना-राष्टÑवादीची टक्कर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:17 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व सिध्द करणाºया शिवसेनेला २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेस टक्कर देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने ५ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता, तर राष्टÑवादी काँग्रेसने २ विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण या तीन ठिकाणी सेनेचे आमदार निवडून आले. दापोली व गुहागर या दोन मतदारसंघात राष्टÑवादीने बाजी मारली. मात्र, त्यानंतर अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने मोठी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या ५५पैकी ३९ जागा सेनेने पटकावल्या व जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली. राष्टÑवादीला १६ जागांवर विजय मिळाला. मात्र, अन्य पक्षांचा या निवडणुकीत पुरता सफाया झाला.

येत्या आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारने नगराध्यक्षांप्रमाणेच गावचा सरपंचही थेट जनतेतून निवडून आणण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पक्षीय चिन्ह देण्यात आली होती. थेट सरपंच निवडणुकीसाठीही पक्षाची चिन्ह वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निवडून आले यापेक्षा थेट सरपंच निवडून आणण्यास अधिक महत्व येणार आहे. सरपंच निवडून आल्यास ग्रामपंचायतीची सत्ता संबंधित पक्षाच्या हाती येणार आहे. त्यामुळेच जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून येऊ शकेल, अशा लोकप्रिय उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात जागा मिळाल्या नाहीत तरीही आता भाजपकडील इनकमिंग सध्या जोरात वाढले आहे. पक्ष राज्यात सत्तेवर असल्याने जिल्ह्यात थेट सरपंच अधिक प्रमाणात निवडून आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता आहे. कॉँगे्रस अद्यापही कूल कुलच आहे.