शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

वडाची साल पिपलाक लाव, अनी साहित्याची गोडी लाव रे म्हाराजा!; संगमेश्वरी बोलीतील साहित्यिक गुढीला घालण्यात आले गाऱ्हाणे

By अरुण आडिवरेकर | Updated: March 23, 2023 17:42 IST

रत्नागिरी : ‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची ...

रत्नागिरी : ‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची पुंजा केलीली हाय.. ती मान्य करून घे. वाचनान्याला ढिगभर पुस्तकाचा वाचयाची वांशा देस.. लिवनार्‍यांच्या हातात ताकत देस.. बोलनार्‍याच्या त्वांडार सरस्वती नाचनं दे.. असा सगला बरा करून वडाची साल पिपलाक लाव.. उलट्याचा सरल कर.. अनी साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा..!’ असे संगमेश्वरी बोलीतील खणखणीत गाऱ्हाणे साहित्यिक गुढीला घालण्यात आले.जनसेवा ग्रंथालयातर्फे वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वाढीस लागावी, समृध्द व्हावी या हेतूने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ग्रंथालयाच्या प्रांगणात साहित्यिक गुढी उभारण्यात आली होती. यावेळी हे गाऱ्हाणे घालण्यात आले. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते साहित्यिक गुढीचे पूजन आणि ग्रंथपूजन करण्यात आले.यावेळी जनसेवाचे अमोल पालये यांनी साहित्यिक गुढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. ही गुढी रत्नागिरीची साहित्य, वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी उभारली आहे. या गुढीची काठी ही लेखणीची प्रतीक आहे आणि या गुढीचा गढू हा विचारांचा प्रतीक आहे. लेखणीतून चांगले साहित्य, चांगले विचार प्रसवावेत, ही या गुढीची संकल्पना आहे, असे अमाले पालये यांनी सांगितले.रत्नागिरीतील चित्रकार आणि जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी नेहमीप्रमाणे साहित्यिक गुढीचे आकर्षण ठरणाऱ्या साहित्य पताका यावर्षीही साकारल्या होत्या. यावर्षी पताकांवर नामवंत साहित्यिकांची नावे आणि त्यांची सुबक चित्रे त्यांनी स्वत: रेखाटली होती.यावेळी ग्रंथालयात लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी आणि उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका श्रध्दा कळंबटे, जनसेवाचे सु. द. भडभडे, चित्रकार श्रीनिवास सरपोतदार, मधुसुदन नानिवडेकर, आभा घाणेकर, ग्रंथपाल सिनकर, सुजाता कोळंबेकर, मेघा कुलकर्णी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgudhi padwaगुढीपाडवा