शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आंबेत पुलाखाली वाळू उपसा

By admin | Updated: July 8, 2014 00:22 IST

लाईफलाईन संकटात : वाळू उपसा ठरतोय कलहाचे कारण

मंडणगड : तालुक्याची लाईफलाईन असणाऱ्या आंबेत म्हाप्रळ पुलाला वाळूमाफियांकडूनच धोका निर्माण झाला आहे़ म्हाप्रळ खाडीत दिवसागणिक सुरु असलेला वाळू उपसा कलहाचे कारण ठरत आहे.खाडीपात्राची खोली वाढल्याने आता जवळपास दीडशे फूट खोलीवरही वाळू मिळत नाही़ त्यामुळे वाळूमाफियांना वाळू मिळविण्यासाठी पुलाखालीच संक्शन पंप लावावे लागत आहेत़ याठिकाणी संक्शन लावण्यावरून सोमवारी वाळूमाफियांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती पुढे आली आहे.म्हाप्रळ रेती बंदर परिसरात केवळ हातपाटीच्या माध्यमातून वाळू उपसा करण्यास शासनाने सुमारे तीन वर्र्षांपूर्वी परवानगी दिली होती. त्यामुळे संयुक्त रेती गटाच्या पाण्यातील सीमांचा फायदा घेऊन रायगड जिल्ह्यातील रॉयल्टीच्या आधारे म्हाप्रळचा वाळूव्यवसाय उभा आहे. संयुक्त रेती गट असतानाही केवळ रायगडमध्ये हातपाटीला परवानगी देण्यात आल्याने म्हाप्रळमध्ये अनधिकृत वाळू उपशास मोठी चालना मिळाली आहे. वाळू, मजुरांची उपलब्धता व उपशावर होणार एकूण खर्च यांचा विचार करता वाळूमाफियांनी संक्शनवर पूर्णपणे बंदी असतानाही दोन वर्षांपासून त्याचा राजरोसपणे वापर सुरु आहे. यंत्रणेला ‘मॅनेज’ करुन दिवसाही संक्शनव्दारे वाळू उपसा सुरु असतो.संक्शन खाडी पात्रात शंभर फुटांचा पाईप लावूनही चिखलमिश्रीत वाळू मिळत असल्याने येथील वाळूमाफियाने चक्क मंडणगड-आंबेत पुलाखाली संक्शन लावला. त्याच्या या कृत्यामुळे वाळूमाफियांमध्येच जोरदार भांडण झाले. नंतर हा विषय सारवासारव करुन मिटवण्यात आला. असे असले तरी धोक्याची सूचना देऊनही वाळूमाफियांची नजर आता आंबेत पुलाखाली असलेल्या वाळूकडे गेली आहे. या साऱ्या घटनाक्रमात महसूल विभाग मूग गिळून गप्प बसला आहे़ संक्शनचा वापर पूर्णपणे बेकायदेशीर असतानाही म्हाप्रळ खाडीपात्रात डझनांनी संक्शन पंप पडलेले आहेत़ त्याचा राजरोस वापर होऊनही गत पाच वर्षात महसूल विभागाला एकदाही संक्शनच्या मदतीने वाळू उपसा करणारा एकही गुन्हेगार सापडला नाही.म्हाप्रळ खाडीपात्रात सुरु असलेल्या बेकायदा संक्शनला अटकाव करण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)