दापोली : तालुक्यातील हर्णै बंदरात जेटी बांधलेली नसल्यामुळे मच्छीमारांना आपल्या नौका बंदरात उभ्या करणे मुश्किल झाले आहे. वातावरणातील बदलत्या हवामानामुळे मासेमारी हंगामाच्या शुभारंभालाच मच्छीमारांना आपल्या नौका हर्णैपासून दूर असलेल्या अन्य बंदरात न्यावे लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै बंदरात सामसूम दिसत आहे.
राजकीय वातावरण तापू लागले
चिपळूण : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या झंझावाती दौऱ्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
तेलाचा तवंगाचे गूढ
दापोली : तालुक्यातील दाभोळ ते केळशी या ५० किलाेमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलचा तवंग आल्याने समुद्र किनारा पूर्णपणे काळवंडला आहे. ऑइल किंवा डांबरसदृश गोळे किनाऱ्यावर आले आहेत. त्यामुळे माशांना धोका निर्माण झाला आहे.
अवजड वाहतूक सुरू राहणार
राजापूर : ओणी-पाचल मार्गावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनचालकांना ऐन गणेशोत्सवात मोठा त्रास सहन करावा लागलेला असतानाच आता या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहणार आहे.
महामार्गावर अनधिकृत बांधकामे
खेड : मुंबई-गोवा महामार्गालगत खेड तालुक्यातील कशेडी ते परशुराम या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम नियमांचे उल्लंघन करत इमारती व दुकान गाळे उभे करण्यात येत आहेत. त्याकडे स्थानिक पातळीवरील महसूल विभागाचे व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.