राजापूर : तालुक्यात शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या स्वॅबपैकी १५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या अगोदर दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आजपर्यंत तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली होती. त्यामुळे राजापूर तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत होता; मात्र आता पुन्हा रुग्ण सापडू लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
मागील चार दिवसांपूर्वी राजापूर शहरालगतच्या दोनिवडे येतील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील १० व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील नाणार पाळेकरवाडी येथील १ व्यक्ती, पाचल पेठमापवाडी येथील २ व्यक्ती रत्नागिरी येथे पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर राजापूर शहरालगतच्या कोंढेतड गाडगीळवाडी येथील १ व्यक्ती व उन्हाळे कणेरीवाडी येथील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.
शनिवारी दिवसभरात राजापूर तालुक्यात एकूण १५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.