शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:06 IST

दापोली : एस. टी.चे कर्मचारी जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु या कर्मचाºयांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करित ...

दापोली : एस. टी.चे कर्मचारी जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु या कर्मचाºयांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करित आहे. कामगार संघटनेच्या सहनशिलतेचा अंत सरकारने पाहू नये असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दापोली येथे बोलताना केला. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या दापोलीत आयोजित केलेल्या ५५व्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी पवार बोलत होते. राज्यभरातील २० हजार एस. टी. कर्मचारी या अधिवेशनासाठी दापोलीत आले आहेत.या अधिवेशनात बोलताना पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. एस. टी. कर्मचाºयांचे प्रश्न असो वा कामगारांचे प्रश्न या शासनाने आश्वासनांपलिकडे काहीही केले नाही. त्यामुळे समाजात जाऊन काम करणाºया अशा कर्मचाºयांमध्ये शासनाविषयी मोठा असंतोष आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे आपला पाठपुरावा सुरु आहे. मात्र, कामगार संघटनेच्या सहनश्लितेचा अंत सरकारने पाहू नये.यावेळी एस. टी. कामगार संघटनेचे सहसचिव हनुमंत ताटे म्हणाले की, एस. टी. महामंडळ हे शासनाचे आहे. मात्र आमच्या कर्मचाºयांना राज्य शासनाचे कर्मचारी असा दर्जा नाही, सातवा वेतन आयोग नाही. ३२ ते ४८ टक्के वेतनावाढ देण्याची घोषणा करूनही शासनाने ती अद्याप दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.या अधिवेशनाला माजी मंत्री सुनील तटकरे, दापोलीचे आमदार संजय कदम, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे संदीप शिंदे उपस्थित होते.