शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी निकालाच्या तारखाबांबत सोशल मिडियावर अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांच्या अफवा जाहीर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रमावस्था पसरली आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचा खुलासा बोर्डातर्फे करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावी निकालाच्या तारखाबांबत सोशल मिडियावर अफवा अद्याप तारखा जाहीर नसल्याचा बोर्डाचा खुलासा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांच्या अफवा जाहीर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रमावस्था पसरली आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचा खुलासा बोर्डातर्फे करण्यात आला आहे.दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर होणार असल्याबाबतचे संदेश सोशल मिडियावर फिरत आहेत. बारावीचा निकाल दि.२७ मे तर दहावीचा निकाल दि.६ जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे संदेश केवळ अफवा असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.वास्तविक राज्यभरातून दहावी, बारावीसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाच्या तारखांकडे लागले आहे. व्हॉटस्टपवर काही मंडळी खोडसाळपणे तारखा जाहीर करून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखांबाबत सोशल मिडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सोशल मिडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. निकालाच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोणतीही तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या अनधिकृत तारखांवर विश्वास न ठेवता बोर्डाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या तारखांकडे लक्ष ठेवावे.- भावना राजनोरसहाय्यक सचिव, कोकण मंडळ

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी