शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच...!

By admin | Updated: April 12, 2016 01:03 IST

रत्नागिरी नगरपरिषद : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. नगरसेवक बनून इतरांप्रमाणे झगमगत्या दुनियेत प्रवेश करता येईल, अशी आस लावून अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पक्षाकडून आपलीच वर्णी कशी लागेल, यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या राजकीय पतंगांचा मांजा कापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. नगरपरिषदेच्या नोव्हेंबरमधील निवडणुकीसाठी झालेल्या या राजकीय गर्दीत कोणत्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार व किती विद्यमान नगरसेवकांचे पत्ते गुल होणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तिकीट न मिळाल्यास अनेकांनी आतापासूनच अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नवख्या कार्यकर्त्यांमध्ये पदरमोड करून विकासकामे करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांकडून त्याच जागेवर पुन्हा तिकीट मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. या राजकीय स्पर्धेत आता शहरातील प्रत्येक पक्षाचे अनेक कार्यकर्ते उतरले आहेत. नगरपरिषद निवडणूक वॉर्डनुसार झाली तर ३० वॉर्डमध्ये प्रत्येक पक्षाचे ३० उमेदवार असतील. सेना - भाजपमध्ये काडीमोड झाल्याने ते स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे ६० उमेदवार रिंगणात राहणार आहेत. राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेही ३० उमेदवार रिंगणात येतील. भाजप - राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. तरीही इच्छुकांची गर्दी मोठी असल्याने त्यामुळे होणारी बंडखोरी शमविताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेत सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे आहेत. शिवसेनेने स्वबळाचा नारा याआधीच दिला आहे. त्यामुळे सेनेमार्फत विद्यमान १५ नगरसेवक हे पुन्हा उमेदवारीसाठी आग्रही आहेतच. त्यातील काही जणांची तिकिटे यावेळी कापली जाण्याची शक्यता आहे. तसेच कार्यकर्त्यांची फौज अधिक असल्याने व सेनेत जुना नवा वाद असल्याने त्यातूनही उमेदवारी वाटपावरून राग-रुसवे वाढण्याची शक्यता आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास इतर पक्षातून संधी मिळेल काय, याचीही चाचपणी अनेक कार्यकर्ते करीत आहेत. (प्रतिनिधी)