रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योेजनेने आता आपली संकल्पना बदलली आहे. रोजगार हमी योजना विभागाने आता ‘मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर महाराष्ट्र समृध्द’ या तत्वाने वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोक, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना समृध्द करण्यासाठी नव्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
विद्युत टॉवर धोकादायक स्थितीत
चिपळूण : तालुक्यातील टेरव मार्गावरील धामणवणे परिसरात एका उच्चदाब वीजवाहिनी टॉवरनजीक डोंगरातील माती खचल्याने या टॉवरला मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणवणे - टेरव मार्गावर असलेला हा उच्चदाब वीजवाहिनी टॉवर डोंगराळ भागातील उंच टेकडीवर आहे.
मुंबई बँकेकडून मदतीचे वाटप
चिपळूण : मुंबई बँकेचे आगार - २ टीमतर्फे चिपळुणातील नॅब संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पूरग्रस्तांना नुकतेच मदतीचे वाटप करण्यात आले. मुंबईच्या बेस्टमधील चालक, वाहक व त्यांच्या कुटुंबीयांनी चिपळुणातील पूरग्रस्तांसाठी ही मदत एकत्र केली होती. पेठमाप, उक्ताड, शंकरवाडी, पोसरे भागात ही मदत देण्यात आली.
तळेकांटे येथे रस्त्यावर मोठे खड्डे
देवरुख : रत्नागिरी - देवरुख मार्गावर तळेकांटे दत्त मंदिर येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरोधात नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने गणेशभक्तांकडूनही नाराजीचा सूर उमटत आहे.
समस्यांसाठी पाठपुरावा
रत्नागिरी : जिल्हा परिषद कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनाचा प्रश्न शासन पातळीवर कायमस्वरुपी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेद्वारे राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते बबन बांडागळे यांनी दिली.