शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:06 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देबाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणारनिरंजन डावखरे यांच्या तारांकित प्रश्नावर पंकजा मुंडेंची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली. जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूरदरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भातील आराखडा प्रलंबित होता. त्यावरुन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज तारांकित प्रश्व विचारला होता. त्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तर दिले. कोकण ग्रामीण पर्यटन विकास समितीच्या आगामी बैठकीत पर्यटक सुरक्षा आराखड्याबाबत प्रस्ताव सादर केला जाईल. या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून 650 लाईफ जॅकेट खरेदी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून समुद्रकिनाऱ्यावर वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत, असे मंत्री मुंडे यांनी नमूद केले. रत्नागिरी विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : डावखरेदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याचा सुमारे 700 ते 800 कोटींचा विकास आराखडा प्रलंबित आहे. या आराखड्याच्या मंजूरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करून आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गRatnagiriरत्नागिरी