शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रत्नागिरीच्या सुकन्येची हवाई भरारी

By अरुण आडिवरेकर | Updated: March 11, 2023 17:54 IST

रत्नागिरी : येथील ऋतुजा शैलेश मुकादम हिने हवाईसुंदरीच्या अभ्यासक्रमात चांगले गुण प्राप्त करून यश मिळविले. या यशानंतर ती हवाईसुंदरी ...

रत्नागिरी : येथील ऋतुजा शैलेश मुकादम हिने हवाईसुंदरीच्या अभ्यासक्रमात चांगले गुण प्राप्त करून यश मिळविले. या यशानंतर ती हवाईसुंदरी म्हणून सेवा बजावण्यासाठी सज्ज झाली आहे. दिल्लीहून हवाईसुंदरीचे प्रशिक्षण पूर्ण करून ती मुंबईत परतल्यानंतर विमानतळावर तिच्या आई-वडिलांनी तिचे स्वागत केले.लहानपणापासून हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा हिचे शालेय शिक्षण फाटक हायस्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इंग्लिश मास्टर डिग्री संपादन केली. २०१९ मध्ये कोविडमुळे विमानसेवा ठप्प होती. या काळात ऋतुजाने इंटरनॅशनल सीडेस्कोचा ब्युटिशियनचा कोर्स करून त्यातही यश मिळविले. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करता करताना तिला हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न पडू लागले.अखेर तिने आजी-आजोबा, आई-वडील यांच्या सहकार्याने इंडिगो एअरलाईन्समध्ये मुलाखत दिली. प्रथम फेरीतच ती उत्तीर्ण झाली. ऋतुजा मुकादम हिच्या यशात आई उमा व वडील शैलेश मुकादम यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्ली येथे हवाईसुंदरीचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन ऋतुजा रत्नागिरीला परतली आहे. येत्या काही दिवसांत ऋतुजा हवाईसुंदरीची सेवा बजावण्यासाठी मुंबईत रुजू होणार आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांची ती नात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी