शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील पदे भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार-राजन  साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:40 IST

जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे  हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची तातडीने दखल -अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे  हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना तत्काळ हजर करून घेण्याचे अधिकार आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.

राजापूर, रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालये व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टरांची अनुपलब्धता हा प्रश्न ऐरणीवर असून इतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन आमदार राजन साळवी यांनी समस्या जाणून घेतल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘जिल्हा रूग्णालयाकडे आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन राजन साळवी यांनी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन यशस्वी चर्चा केली. त्यासमयी आरोग्य संचालक डॉ. कांबळे, सहसंचालक डॉ. आंबडेकर उपस्थित होते.

भेटीदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी फोनवरून चर्चा करून देत ही समस्या गंभीर असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. विषयाचे गांभिर्य लक्षात घेता आरोग्यमंत्री सावंत यांनी तत्काळ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला येणाºया उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना तत्काळ हजर करून घेण्याचे अधिकार दिले. ज्यामुळे येणाऱ्या उमेदवारांना त्वरित नोकरी मिळून कामावर रुजू होण्यास मदत होणार आहे. 

तसेच राजन साळवी यांनी आरोग्यमंत्री सावंत यांचे लक्ष वेधत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे बंद अवस्थेत असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलीसीस मशीन व प्रतीक्षागृहाची आवश्यकता या समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी त्वरित माहिती मागवून आवश्यक असलेले सिटीस्कॅन मशीन व ४ डायलिसिस मशिन्स हे मंजूर झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी