शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्तीचा मोबदला म्हणून अजूनही दिले जाते भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:13 IST

मेहरून नाकाडे  रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची ...

ठळक मुद्देशिपोशीतील नागवेकर कुटुंबाचा तीन पिढ्यांपासूनचा वारसा आजही कायमपूर्वी मोबदल्याचा भात आणावे लागत असे बैलागाडीतून

मेहरून नाकाडे रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत आहे. पूर्वी गणेशमूर्ती बनवणाऱ्यांना मोबदला म्हणून शेतकरी धान्य देत. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील मूर्तिकार नागवेकर कुटुंबाने तीन पिढ्यांपासून हा वारसा आजही जपला आहे. या गावात मूर्तीसाठी पैसे न देता आजही भात दिले जात आहे.शिपोशी येथील वामन जनार्दन नागवेकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. मूर्तिशाळेत १५० ते १७५ गणेशमूर्ती तयार करण्यात येत असत. त्यावेळी गावातील तसेच बाजूच्या केळवली, सालपे गावातील शेतकरी गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती घरी घेऊन जात असत. मात्र, त्यासाठी पैसे न देता त्याऐवजी भात देण्यात येत असे.

शंभर टक्के लोक त्यावेळी भातच देत असत. आठ पायली ते मणभर भात देण्यात येत असे. भात कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या सणाला गावातील शेतकरी वामन नागवेकर यांना बोलावून भात देत असत. त्यामुळे खंडीभर भात गोळा होत असे. बैलगाडीतून भात घरी आणला जात असे.वामन यांच्याकडून सुरू झालेली ही प्रथा त्यांचे पुत्र दत्ताराम यांनीही जपली होती. आता तर दीपक यांची तिसरी पिढी या प्रथेचे पालन करीत आहे. काळाच्या ओघात भात देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही दहा ते बारा लोक पैसे न देता, भातच देत आहेत.

नागवेकर कुटुंबियांनाही पैशांऐवजी भातच घेणे आवडते. त्यामुळे गावठी भात उपलब्ध होतो. आजही दीपक यांच्याकडे शाडूच्या मातीपासून १५० गणपती तयार केले जातात. सध्या त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे रंगकाम सुरू आहे. कारखान्यातील कलाकार रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत.यावर्षी कोरोनामुळे बहुसंख्य मंडळींचे रोजगार गेले आहेत. नोकरी गेल्याने मुंबईकर गावीच थांबले असून, शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या मोबदल्यात भात देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रंग व साहित्याचा वापर केला जात आहे. मात्र भातावरचे गणपती ही प्रथा नागवेकर कुटुंबियांनी जपली आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी