शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

समाज, धर्माचार्य एकत्र आल्यास क्रांती

By admin | Updated: October 15, 2016 23:16 IST

देवेंद्र फडणवीस : नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सुरू; ५६ हजारांवर लोकांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

रत्नागिरी : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत ५६ हजारांपेक्षा अधिक लोक मरणोत्तर देहदानाला तयार होतात, ही साधी गोष्ट नाही. हा महान त्याग असून, यापेक्षा मोठा चमत्कार असूच शकत नाही. जेव्हा समाज आणि धर्माचार्य अशा कामामध्ये उभे राहतात तेव्हा मोठी क्रांती होते, असे उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील नाणीजधाम येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विनायक राऊत, खासदार नानाभाऊ पटोले, आमदार उदय सामंत, राजन साळवी, संजय कदम व सदानंद चव्हाण, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार विनय नातू, सूर्यकांत दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर उपस्थित होते. उपस्थितांच्या स्वागतानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानाने गेल्या अनेक वर्षांत राज्यात व राज्याबाहेर केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तब्बल ५६ हजारांहून अधिक लोकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संकल्प केल्यानंतर दिवंगत झालेल्या तीन लोकांचे देहदान करण्यातही आले आहे. या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांचा मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संस्थानने गेल्या काही वर्षात अनेक समाजोपयोगी कामे करून समाजाशी बांधिलकी जपली आहे. समाजाची व देशाची सेवा करण्याचा जो संकल्प नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे त्यानुसार या संस्थानकडून भविष्यातही अनेक चांगली कामे पूर्ण होतील. माणूस जिवंतपणी आपल्यासाठी जगतो. मरणानंतरही दुसऱ्याला काही देत नाही. प, या संकल्पामुळे मरणानंतरही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी आणता येतो. दरवर्षी पाच लाख अवयवांची गरज असते. त्यासाठी आवाहन करूनही गतवर्षी देहदानाचे प्रमाण केवळ .००८ टक्के एवढे होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा देहदान उपक्रम देशातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा उपक्रम असावा, असेही फडणवीस म्हणाले. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, संस्थानची सामाजिक उपक्रमांची चित्रफीत पाहिल्यानंतर संस्थानचे कार्य अधोरेखित झाले. ३ लाख लोकांना व्यसनमुक्त केले. हजारो लोकांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला. त्यामुळे असे उपक्रम राबविणारे व रंजल्या गांजलेल्यांना मदतीचा हात देणारे हे संस्थान प्रशंसेला पात्र आहे. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, नरेंद्राचार्यजी महाराजांच्या संस्थानाने राबविलेला देहदान, रक्तदान उपक्रम कौतुकास्पद आहे. विविध सामाजिक गरजा भागविण्याचे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. ज्यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केल्याच्या दुसऱ्या दिवशी देशात दिवाळी साजरी झाली. लोकांमध्ये ही ऊर्जा आली कोठून? नरेंद्राचार्यजी महाराजांनी देहदानाचे आवाहन केल्यानंतरही त्याला भरभरून प्रतिसाद देणाऱ्यांमध्येही अशीच ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळेच ५६ हजारांवर लोकांनी देहदानाची तयारी दर्शवली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, आपला देश हा ऋषीप्रधान आहे तसाच कृषीप्रधान आहे. नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानाने गेल्या काही वर्षात समाजातील सर्वच क्षेत्रात चांगले काम केले आहे. शेतकऱ्यांना अवजारांचे वाटपही केले आहे. शिक्षण क्षेत्रातही संस्थेचे योगदान आहे. हे समाजकार्य यापुढेही सुरू राहावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) धर्मसत्तेनेच सावरले : जेव्हा जेव्हा राजसत्ता भ्रष्ट झाली, तेव्हा तेव्हा धर्मसत्तेनेच त्यांना मार्गावर आणले आहे. धर्मसत्तेमुळेच सुसंस्कारित समाज घडला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे ईश्वरीय कार्य... जगद्गुरू नरेंद्राचार्य अर्थात धर्माचार्य यांच्या माध्यमातून चांगला समाज घडतो आहे. कोणताही जातीभेद न ठेवता आपण जगायचे आणि इतरांनाही जगवायचे हे ईश्वरीय कार्य आहे. महाराज समाजात बंधूभाव निर्माण करीत आहेत, हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.