रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने डिसेंबर २०१५अखेर ६४.१० टक्के इतके उद्दिष्ट साध्य करीत जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी ७२ लाख ४३ हजाराचा महसूल जमा केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वसुली रत्नागिरी तालुक्याने केली असून, मंडणगड तालुक्यातून सर्वांत कमी वसुली आहे. चित्रपटगृह, खेळघर, सायबर कॅफे तसेच डीटीएचधारकांकडून मिळणाऱ्या करापोटी जिल्हा करमणूक कर शाखेला महसूल मिळत असतो. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षात २ कोटी ७२ लाख ४३ इतका महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. यात रत्नागिरी तालुका अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ चिपळूण व खेड हे तालुके अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. तसेच राजापूर तालुक्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढत असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ८५ लाख ६२ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्च २०१६पर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास सहायक करमणूक कर अधिकारी अर्चना गोखले यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी) केबल नेटवर्क असणाऱ्या ग्राहकांना शासनाने सेटटॉप बॉक्स अनिवार्य केला आहे. डिसेंबरअखेर सेटटॉप बॉक्स बसविण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतल्याने यामुळे करात वाढ होणार आहे. एप्रिल ते डिसेंबर अखेरची वसुली तालुका इष्टांक वसुली मंडणगड २ ०.६ दापोली ६.५ ४.२१ खेड २२ १५.५५ चिपळूण ५५ २८.४४ गुहागर ११ ७.०९ संगमेश्वर ५.५ ४.३२ रत्नागिरी ६० २७.३३ लांजा २ १.५६ राजापूर ४ ४.२३ एकूण १६८ ८६.८१ डीटीएच २५७ १८५.६२ एकूण ४२५ २७२.४३
वर्षभरात पावणेतीन कोटीचा महसूल
By admin | Updated: January 13, 2016 22:02 IST