शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

क्रीडा स्पर्धा भरवण्याची परंपरा महसूलने उत्तम राखली

By शोभना कांबळे | Updated: January 13, 2024 16:37 IST

कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्र्यांचे गाैरवोद्गार 

रत्नागिरी : विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची परंपरा महसूल विभागाने उत्तम राखली आहे, असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

यावेळी महसूल मंत्री विखे-पाटील यांनी यजमान रत्नागिरी जिल्ह्याने खूप चांगले आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. अशा स्पर्धांमधून विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळखी होतील. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल, असे सांगून त्यांनी या तीन दिवसीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यात स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्राला विकासात्मक दृष्टीने पुढे नेणं हाच महसूलचा उद्देश आहे. महसूल आणि पोलीस खात्याला शासनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते महत्त्व असेच टिकवून ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार जाधव यांनी महसूल विभागाने देशाची यंत्रणा मजबूत केल्याचे सांगून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळावा, अशा शुभेच्छा दिल्या.

विभागीय आयुक्त डाॕ कल्याणकर म्हणाले, महसूल विभाग वेगवेगळ्या पध्दतीची कामे वर्षभर करत असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने या जिल्ह्यातून नव चैतन्य घेवून आपापल्या जिल्ह्यात चांगले काम करु. गुणांना वाव देवून हिरिरीने काम करु, असे सांगितले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकेत क्रीडा स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी नासा व इस्रोसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खेळाडुंनी संचलन करुन मानवंदना दिली. यानंतर खेळाडुंना प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी शपथ दिली. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३- २४ चे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करुन आणि रंगीत फुगे हवेत सोडून, महसूल मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, महसूलचे अपर मुख्य सचिव डाॕ. राजगोपाल देवरा, आयकर विभागाच्या आयुक्त डाॕ माधवी आर एम, विभागीय आयुक्त डाॕ महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.संचलनमधील प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- रायगड, तृतीय- मुंबई उपनगर. १०० मिटर धावणे पुरुष प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- सिंधुदुर्ग, तृतीय- रायगड. १०० मिटर धावणे महिला प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- रायगड, तृतीय- सिंधुदुर्ग. विजेत्यांना महसूल मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सर्वांचे आभार मानले.