शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात विश्रांतीगृह, नियोजनच्या बैठकीत अंदाजपत्रकाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 10:27 IST

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा नियोजनच्या बैठकीत ६५ लाखाचा निधी मंजूरनातेवाईकांसाठी विश्रांतीगृह उभारण्याचा मार्ग मोकळा,

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये विश्रांतीगृहासाठी ६५ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. आमदार साळवी यांच्या मागणीनुसार तातडीने पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नाविन्यपूर्ण योजनेमधून या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा रूग्णालयात रूग्णांसोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना मुक्काम करण्यासाठी किंवा काही काळ प्रतीक्षा करण्यासाठी खूप हाल सहन करावे लागतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आधार घ्यावे लागतात. जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाचे नातेवाईक रत्नागिरी येथे असतातच असे नाही.

त्यामुळे त्यांना आपल्या निवाऱ्यासाठी मोठी परवड सहन करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन जिल्हा रूग्णालयाच्या आवारामध्ये रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह बांधण्याची मागणी केली होती.त्यानंतर आमदार साळवी यांनी मागील जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्री वायकर यांच्याकडे मागणी केली होती. वायकर यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारामध्ये रूग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्रांतीगृह उभारण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आमदार साळवी यांनी अंदाजपत्रक तयार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला.

दिनांक २९ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये यासाठी ६५ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्यामुळे आता नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी