शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

महिला बचतगटांची उमेद वाढवणारा प्रतिसाद Synopsis*

By admin | Updated: October 24, 2015 00:50 IST

खाद्यपदार्थ स्पर्धा : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातर्फे आयोजित बचत गटांसाठीच्या खाद्यपदार्थ स्पर्धेला जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साळवी स्टॉप- नाचणे रोड येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय आयोजित स्पर्धा आणि प्रदर्शनात जिल्ह्यातील ५०पेक्षा जास्त बचत गट सहभागी झाले होते. पालकमंत्री रवींद्र वायकर यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील बचत गटांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे बचत गटांची उत्पादने विविध माध्यमांतून ग्राहकांसमोर मांडून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रदर्शनादरम्यान आयोजित सत्रात उपस्थित बचत गट सदस्यांना पॅकेजिंंग व मार्केटिंग बाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.स्पर्धेमध्ये बचत गटांकडून दिवाळीचा फराळ, कोकणी पदार्थ, सरबत, ज्यूस, पापड, लोणचे, विविध प्रकारचे पीठे व मसाला अशा प्रकारचे अस्सल कोकणी स्वादाचे पदार्थ सादर करण्यात आले होते. नागरिकांनीदेखील या खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनास प्रतिसाद देऊन आपल्या आवडीच्या पदार्थांची (दिवाळी फराळ व इतर) प्रत्यक्ष पाहणी करुन खरेदीसाठी बचत गटाकडे आॅर्डर नोंदवल्या. समारोपप्रसंगी प्रदर्शनात सहभागी बचत गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गौरवण्यात आले. प्रदर्शनात सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी केली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)