आबलोली : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे वाढत्या महागाईविरोधात महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले. ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे गाजर दाखवून मोदी सरकारने इंधन, रेल्वे भाडेवाढ, मुंबईत रेल्वे व मेट्रोची भाडेवाढ केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने दरवाढ व महागाई आटोक्यात आणावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन देताना गुहागर शहराध्यक्ष मानसी शेट्ये, नगरसेविका स्नेहा भागडे, मानसी कदम, जिल्हा परिषद सदस्या पूर्वा ओक, पंचायत समिती सदस्या गायत्री जाधव, पूनम पाष्टे, श्रद्धा पवार, सुवर्णा भोसले, कुटगिरी सरपंच रसिका आंबवकर, मोहिनी पांचाळ, लक्ष्मी डिंगणकर, सुवर्णा कदम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Updated: July 9, 2014 23:53 IST