शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गाडगीळ समितीचा अहवालच खाडीपट्ट्याला तारक

By admin | Updated: November 2, 2014 00:46 IST

अंमलबजावणीसाठी आग्रह : खाडीपट्टा भागात विविध ठिकाणी बैठक सत्र

खाडीपट्टा : तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या माधव गाडगीळ यांनी कोकण आणि पश्चिम घाट याबद्दल केलेल्या अभ्यासपूर्ण अहवालाची अंमलबजावणी झाली तरच खाडीपट्ट्यासह संपूर्ण कोकणाला भविष्य आहे, असे मत खाडीपट्ट्यातील समविचारी लोकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या अंमलबजावणीसाठी एकत्रित येण्याचे आवाहनही नुकतेच झालेल्या खाडीपट्ट्यातील बैठकीत करण्यात आले. खाडीपट्ट्यासह संपूर्ण कोकणातील नितांत सुंदर भुभाग वाचविण्यासाठी त्या अहवालातील शिफारशी हाच खाडीपट्ट्यासह कोकणी माणसाचा समृद्ध कोकणाचा आणि पश्चिम घाटाचा अंतिम आधार असून त्याची योग्य दखल घेऊन अंमलबजावणी केली तरच खाडीपट्ट्यासह कोकणाला भविष्य आहे. त्यासाठी या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी खाडीपट्ट्यातील निसर्ग आणि वन्यजीव क्षेत्रातील अनुभवी व पर्यावरणप्रेमी व कार्यकर्त्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील बहुतांश भाग हा पश्चिम घाटअंतर्गत येत असून अदूरदर्शी राजकीय निर्णयामुळे आतापर्यंत दिसणारा विकास व प्रगती ही पर्यावरणाची आणि कोकणच्या समृद्ध अशा निसर्गाची हानी दिसणारी आहे. त्याचे दुष्परिणाम खाडीकिनाऱ्यापासून ते मच्छिमार बांधवांपर्यंत सर्वांनाच दिसू लागले आहेत. विकासाच्या नावाखाली अनियंत्रित शहरीकरण दिसते आहे. अशावेळी गाडगीळ यांनी अत्यंत नि:स्वार्थीपणे मांडलेला अहवाल हाच येथील भूमिपुत्रांना तसेच समृद्ध अशा निसर्गाला वाचवू शकेल, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. हा अहवाल राजकीय हितसंबंधांना बाधा आणणारा असल्याचे राजकीय नेत्यांना पतपुरवठा करणारे धनाढ्य उद्योजक, कंपन्या आणि बेकायदेशीर व्यावसायिकांना चाप लावणार असल्याने राजकीय नेते तो कदापि मान्य करणार नाहीत हे सत्य जनतेने समजावे आणि गाडगीळ अहवालाच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, नागरिक व निसर्गप्रेमींनी एकत्रित येऊन शासनाकडे प्रयत्न करायला हवेत, असे के. के. तांबे यांनी सांगितले.खेड तालुक्यात ग्रामीण भागात खाडीपट्ट्यात होणारे वाळू उत्खनन व वृक्षतोड अशा प्रकारांमुळे तेथील पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. या सर्व गोष्टींवर आता पर्यावरण रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे मत तांबे यांनी व्यक्त केले आहे. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)