ऋतुजा नाचरेचा सत्कार
आरवली : कुंभारखाणी बुद्रुक येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत शालांत परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ऋतुजा नाचरे हिला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. मौजे कुंभारखाणी बुद्रुक ग्रामत्कोर्ष संघ, मुंबई संस्थेचे संस्थापक शंकरराव सुर्वे यांच्या स्मरणार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
खेळाडूंची निवड
देवरूख : शेवगाव अहमदनगर येथे होणाऱ्या ४७व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सनगरेवाडी येथील दोन्ही संघ सहभागी झाले होते. दोन्ही संघातील १३ खेळाडूंची निवड रत्नागिरी जिल्हा संघामध्ये झाली आहे.
विजेत्यांचा सत्कार
खेड : तालुक्यातील फुरुस येथील एस. आय. सेकंडरी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहान गटात सिद्धी पाटील, शर्वरी गावडे, आयुष निवळकर यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत साहिल सकपाळ, श्रृती मोहिते, मंदार खामकर यांनी विजेतेपद मिळविले. मुख्याध्यापक संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कातकरी कुटुंबांना मदत
चिपळूण : तालुक्यातील ६८२ कुटुंबांना महापुराचा तडाखा बसला. त्यांना आमदार शेखर निकम यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. केतकी, कोळकेवाडी, कोंढे, पोफळी, कुंभार्ली, शिरगाव, अलोरे, मुंढे, कळकवणे, कोंडवळे, निरबाडे, काळुस्ते, आकले, दळवटणे आदी गावांतील कुटुंबांना मदत करण्यात आली.