शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:20 IST

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

रत्नागिरी : कोविड-१९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.हा सन्मान माझ्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हावासीयांचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख ४२ हजार ०६१ जणांनी लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य पथकांद्वारे विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मात्र नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोकणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामानात मोठे बदल होत आहे. थंडी, ऊन आणि पाऊस असे वातावरण असल्याने नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी