शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

कोरोना कसोटीच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांनीही सहकार्य करावे - संघमित्रा फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तसेच महिला रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दर दिवशी लक्षणीय वाढ होत आहे. असे असतानाही ...

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तसेच महिला रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दर दिवशी लक्षणीय वाढ होत आहे. असे असतानाही या रुग्णांचे नातेवाईक या परिसरात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणे, ही जबाबदारी कोरोना रुग्णांच्या नातेवाई्कांचीही आहे. त्यामुळे त्यांनीही आरोग्य यंत्रणेला याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे यांनी झूम ॲपद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले याही सहभागी झाल्या होत्या.

सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालय आवारात होणारी गर्दी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला डोकेदुखी होत आहे. या वाढत्या गर्दीमुळे या नातेवाईकांमध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांना या नातेवाईकांची गर्दी रोखताना अडचणीचे होत आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून सुरक्षा अधिक कडक केली असल्याचे डाॅ. फुले यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोना रुग्ण आणि अन्य रुग्ण यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असल्याचे यावेळी पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याचे सांगितले. त्यावर डाॅ. फुले म्हणाल्या की, रुग्णांना यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अलीकडेच एका रुग्णाचा मृत्यू, तो मानसिक तणावाखाली असल्याने झाला. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणेने आटोकाट प्रयत्न केले. सध्या रुग्णालयात ऑक्सिजन पाॅईंट कमी असले तरी आवश्यक वेळी सिलिंडर लावतो. रुग्णांचा संपर्क त्यांच्या घरच्यांशी राहावा, म्हणून त्यांना व्हिडीओ काॅलही करून देतो. त्यामुळे अगदी ९५ टक्के लोक यातून बाहेर पडून बरे होत आहेत.

या रुग्णांच्या नातेवाईकांनीही कोरोनाचे संकट ओळखून योग्य खबरदारी घेण्याची जबाबदारी नातेवाईकांचीही आहे. त्यांनीही यंत्रणेला सहकार्य करायला हवे, असेही डाॅ. फुले म्हणाल्या.

जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करून घेतले असून सर्व सुरक्षिततेच्यादृष्टीने २४ तास देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अलीकडेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देताना डाॅ. फुले म्हणाल्या.