शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:31 IST

तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सवप्रकल्प संघर्ष संघटनेच्या भूमिकेकडे लागले साऱ्यांचे लक्ष

राजापूर : तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेची स्थापना केली गेली होती. त्यानंतर अनेक आंदोलने छेडली गेली. सुरुवातीला पक्षविरहीत असलेली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने नंतर मात्र भाजपवगळता प्रत्येक राजकीय पक्षाकडे धाव घेतली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना भेटून नाणारविरोधी लढ्याला पाठबळ द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार काही पक्षांकडून प्रकल्प परिसरात नाणार विरोधात सभादेखील झाल्या होत्या. प्रकल्पविरोधाचा आधार घेऊन परिसरातील गावांत आपला जनाधार वाढवायचा, हा हेतू काही लपून राहिलेला नव्हता.

मात्र प्रकल्पग्रस्तांनी सर्वच सभांना लावलेल्या उपस्थितीमुळे नक्की हा जनाधार कुणाकडे आहे, त्याचा अंदाज आंदोलनातील सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना लागत नव्हता, तर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून पुढील राजकीय वाटचालीबाबत कुठलीच दिशा स्पष्ट करण्यात आली नव्हती. जो पक्ष प्रकल्प रद्द करील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, एवढेच वारंवार सांगितले जात होते.सेना-भाजपमधील युतीसाठी नाणार रद्द करावा लागला आणि प्रकल्पग्रस्त जनतेला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्यामुळेच नाणार गेल्याचे दावे-प्रतिदावे सुरु केले असून, या महिन्याच्या १६ व १७ मार्चला नाणारमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. १७ मार्चला संघर्ष संघटना आपल्या पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेकडून आता याबाबत कोणती भूमिका स्वीकारली जाते. त्याचा आपल्या पक्षाला कितपत फायदा होईल, यावर चर्चांना उधाण आले आहे. याबाबत मतमतांतरे सुरु झाली असून, आडाखेदेखील बांधले जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व करणारे संघटनेचे नेते अशोक वालम १७ मार्चला कोणती भूमिका घेतात, त्याकडे आता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी