शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीविरोधी संघर्ष समिती राजकीय आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:37 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केली

ठळक मुद्देरिफायनरीविरोधी संघर्ष समिती राजकीय आखाड्यातकोकण शक्ती महासंघ नावाने कार्य करणार

राजापूर : एकजुट दाखवून शासनाला रिफायनरी प्रकल्प रद्द करायला भाग पाडणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले असून यापुढे कोकण शक्ती महासंघ या नावाने ओळखली जाणारी नवीन संघटना राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केलीमागील दोन वर्षांपासून नाणार प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलने सुरु होती. ही आंदोलने कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून लढली गेली होती व त्याचे नेतृत्व अशोक वालम यांनी केले होते.

रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा म्हणून या संघटनेने भाजपवगळता शिवसेना, काँग्रेस, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या प्रमुखांशी भेट घेवून प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती.प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेवून शासनाने काही दिवसांपूर्वी प्रकल्पाची अधिसुचना रद्द केली होती. नाणार परिसरातील जनतेच्या एकसंघतेमुळेच प्रकल्प रद्द झाल्याने कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेच्या दोन दिवसांचा महाविजयोत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान अशोक वालम पुढील राजकीय भूमिका जाहीर करतील अशी चर्चा सोशल मिडीयावरुन सुरु असल्याने नक्की कोणती भुमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते.प्रकल्प हटविण्यासाठी लढणाऱ्या जनतेला अनेक पक्षांचे पाठबळ लाभले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आपल्यालाच पाठिंबा देतील अशी अटकळ काही पक्षांची होती. त्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय भूमिका अशोक वालम यांनी जाहीर केली आहे. मागील दोन वर्षे कार्यरत असलेली कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटना हे नाव बदलून यापुढे कोकण शक्ती महासंघ या नावाने संघटना कार्य करणार असल्याचे वालम यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी