शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : कोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:42 IST

कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन - चार दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समर्थकांमधून देण्यात आली.

ठळक मुद्देकोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यातदोन-चार दिवसांत उमेदवाराच्या नावाची घोषणा

राजापूर : कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन - चार दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समर्थकांमधून देण्यात आली.याबाबत कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, जनहीत संघर्ष समिती, नाणार, ग्रीन रिफायनरी समन्वय समिती, नाणार, राजापूर तालुका विकास प्रतिष्ठान, राजापूर व राजापूर तालुका समन्वय समिती यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवताना उमेदवार उभा करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. कोकणात औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात क्रांती आणू शकेल, अशा रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे पक्ष व त्यांचे उमेदवार रिंगणात असल्याने प्रकल्प समर्थकांमधून विरोधाच्या तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत.या मतदारसंघाला रोजगाराची नितांत गरज आहे. मात्र, तो आणला गेला नाही. उलट कोकणात आलेले प्रकल्प विनाशकारी ठरवून त्यांना विरोध केला गेला. त्यापैकी एक रिफायनरी असून, आमची रोजीरोटी हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. या भावनेतून प्रकल्प समर्थक संघटनांनी निर्धार करीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या समर्थकांनी बोलताना सांगितले.रिफायनरीच्या रुपाने आलेली रोजीरोटी हिरावून घेणाऱ्यांना मतदान करायचे नाही. त्याऐवजी प्रकल्पाला समर्थन म्हणून आपला उमेदवारच उभा करायचा, असा जोरदार निर्णय प्रकल्पसमर्थक संघटनांनी घेतला आहे. दोन-चार दिवसांत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक