शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर

By शोभना कांबळे | Updated: July 26, 2023 14:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह राजापूर तालुका दौऱ्यावर सकाळीच रवाना झाले आहेत.जिल्ह्यात बुधवारीही पावसाची संततधार कायम आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर करताच जिल्हाधिकाऱ्यांनी आज,  बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा - महाविद्यालये यांना सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तसेच लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. १९ आणि २० जुलै या दोन दिवसांत २५० मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला आहे. त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आहे.बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजापुरात दाखल झाले. संपूर्ण प्रशासन आपत्तींच्या अनुषंगाने लक्ष ठेऊन आहे. दरडग्रस्त तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन रहावे. तसेच सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काही आपत्ती आल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राजापुरात पुन्हा पूरस्थिती

अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता. त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरcollectorजिल्हाधिकारी