शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाटात दरड कोसळली

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

महामार्गावरची वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पवासामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात मंगळवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प होती. आंबेड बुद्रूक येथे गोठा कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडत आहेत. वादळी वाऱ्यासहीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे तर रस्त्याशेजारची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडत आहेत. मंगळवारीदेखील तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा घाटातील चक्रीवळण ते गायमुख दरम्यान रात्री ८ वाजता भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली. दरडीतील मोठमोठे दगड व माती महामार्गावर पडल्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दरड कोसळल्याची माहिती साखरपा पोलीस दूरक्षेत्राला देताच पोलिसांनी लागलीच बांधकाम विभागाला कळवले व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना साथीला घेत जेसीबीच्या सहाय्याने ही दरड बाजूला करण्याचे काम सुरु केले. साधारणपणे रात्री ११.३० वा. च्या सुमारास संपूर्ण दरड बाजूला करण्यात यश आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. दरम्यान दरड कोसळल्यानंतर दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे पावसामुळे तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील सीताराम गोविंद गुरव यांचा गुरांचा गोठा कोसळल्यामुळे एक गाय जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानाचा गावच्या तलाठ्यानी पंचनामा केला असून त्याचा अहवाल देवरुख तहसीलदार कार्यालयात सुपूर्द केला आहे. तालुक्यात सध्या मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मात्र शेतीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला असून बळीराजा सुखावला आहे. (वार्ताहर)