शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

सीईटी केंद्रासाठी रत्नागिरीचा प्रस्ताव धूळखात पडला

By मेहरून नाकाडे | Updated: April 4, 2025 17:13 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : एमएचटी, सीईटी ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची राज्यस्तरीय परीक्षा आहे. मात्र, या परीक्षांसाठी रत्नागिरी ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : एमएचटी, सीईटी ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची राज्यस्तरीय परीक्षा आहे. मात्र, या परीक्षांसाठीरत्नागिरी जिल्ह्यात केवळ दाेन केंद्र असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरपट हाेत आहे. विशेष म्हणजे या परीक्षांसाठी केंद्र मिळण्याबाबत रत्नागिरीतील फिनाेलेक्स अकॅडमीने प्रस्ताव पाठविला आहे. पण, या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र देण्यात आलेले नाही. जिल्ह्यात केवळ दाेन ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याने रत्नागिरीसह अन्य सहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अन्य तालुक्यात जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय हाेते.रत्नागिरी येथे परीक्षा केंद्र झाल्यास विद्यार्थ्यांची फरपट थांबेल. याबाबत रत्नागिरीतील फिनोलेक्स अकॅडमीने एमएचटी, सीईटी परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत तसा प्रस्तावही सीईटी सेल यंत्रणेकडे पाठविला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप धूळखात पडला आहे.

सहा वर्षापूर्वी परीक्षा रत्नागिरीतसहा वर्षापूर्वी सलग दोन वर्ष एमएचटी, सीईटी परीक्षा रत्नागिरीतील फिनोलेक्स अकॅडमी येथे घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर परीक्षा घेणारी एजन्सी बदलली व परीक्षा केंद्र बंद झाले. त्यामुळे राजापूर, लांजा आणि रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना भरणे (खेड), खेर्डी (चिपळूण) येथे जावे लागत आहे.

जेईई, नीट परीक्षा रत्नागिरीतफिनोलेक्स अकॅडमी येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी द्यावी लागणारी जेईई, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट या केंद्रीयस्तरावरील परीक्षेसाठीचे केंद्र आहे. मात्र, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र देताना दुजाभाव केला जात आहे.

एजन्सीचा दुजाभावसीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी नॅशनल रिक्वायरमेंट कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीअंतर्गत २० विविध एजन्सी आहेत. या एजन्सी परीक्षा केंद्र निश्चित करतात. या एजन्सीने केंद्र देण्याबाबत निरुत्साह दाखविला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षा