शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरीची ‘पॉवरबाज’ प्रतीक्षा

By admin | Updated: January 28, 2016 00:21 IST

स्केटिंग शिकत असतानाच पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला.

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी स्केटिंग शिकत असतानाच पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक्षा साळवी हिने यश संपादन केले. पॉवरलिफ्टिंगबरोबर हॅण्डबॉल, बास्केटबॉल, तलवारबाजी स्पर्धेतही नैपुण्य मिळविले आहे. भविष्यात महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय असून, आपण ते पूर्ण करणार असल्याचे प्रतीक्षा हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असतानाच शाळेच्या खो-खो संघात प्रतीक्षा खेळत होती. मात्र, सातवीची परीक्षा पास झाल्यानंतर तिने स्केटिंगचे प्रशिक्षण सुरू केले. त्याचवेळी पॉवरलिफ्टिंगचा सराव करणाऱ्या खेळाडूंकडे पाहून आपणही असे काही तरी वेगळे शिकावे, अशी इच्छा निर्माण झाली व तिने पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. परंतु मध्यंतरी काही वर्षे त्यात खंड पडला होता. त्या कालावधीत तिने हॅण्डबॉल, बास्केट बॉल, तलवारबाजी याचे कौशल्य संपादन केले. बारावी पास झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रतीक्षाने पॉवरलिफ्टिंग सराव सुरू केला. सध्या ती नवनिर्माण महाविद्यालयात बॅचलर आॅफ मॅनेजमेंट स्टडीच्या प्रथम वर्षात शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्ता मिळवून पोलीस प्रशासनात सेवा करण्याची तिची इच्छा आहे. प्रतीक्षाचे बाबा निवृत्त सैनिक असून, आई शिक्षिका आहे. मात्र, दोघांचाही प्रतीक्षाला भरपूर पाठिंबा आहे. वर्षभरात प्रतीक्षाने दोन राष्ट्रीय व एक राज्यस्तरीय स्पर्धा खेळून यश मिळवले आहे. हॅण्डबॉल, तलवारबाजीमध्येही तिने विजय मिळविला असला तरी भविष्यात पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, कॉमनवेल्थ, आॅलिंम्पिक खेळणार असल्याचे सांगितले.सकाळी ८ ते १२ कॉलेज झाल्यावर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सलग पाच तास सराव करते. रविवारी सरावाला सुटी असली तरी स्पर्धेच्या वेळी मात्र सुटीच्या दिवशीही सराव सुरू असतो. सराव करून रात्री घरी आल्यानंतर ती महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करते. दिवसभर तिचे व्यस्त शेड्युल असले तरी कंटाळा न करता मनापासून सराव करते. तिने विविध खेळात बक्षिसे मिळवली तरी तिचा पॉवरलिफ्टिंगकडे तिचा ओढा अधिक आहे. यश रत्नकन्यांचे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिकाराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यशइंदौर (मध्यप्रदेश) सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.सोनिपत (हरियाणा) ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यशवाशिम येथे झालेल्या सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.पायका शालेय हॅण्डबॉल स्पर्धेत रौप्यपदक.वरिष्ठ महिला हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक.सबज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत सहभाग.स्पर्धेसाठी निवडमुंबई विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड.चंद्रपूर येथे २८ ते ३० जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.