शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीचे 'किनारा' प्रथम; अंतिम फेरी नांदेडला

By अरुण आडिवरेकर | Updated: December 28, 2023 15:48 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ नाटकाने प्रथम ...

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबराेबर सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय व नेपथ्याचे बक्षीसही पटकावले. ही फेरी वेंगुर्ले येथे आयाेजित करण्यात आली हाेती. या नाटकाची नांदेड येथे ३ जानेवारी राेजी हाेणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.वेंगुर्ले केंद्रात रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा अशा चार विभागाची चार नाटके झाली. त्यामध्ये जयवंत दळवी लिखित रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. राज्य परिवहन मंडळाच्या नाटकाच्या प्राथमिक फेऱ्या राज्यातील विविध पाच केंद्रावर घेण्यात आल्या. पाचही केंद्रावरुन निवड झालेल्या प्रथम क्रमांकाच्या नाटकांची अंतिम फेरी नांदेड येथे होणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण श्यामसुंदर नाडकर्णी, सुरेंद्र उर्फ बाळू खामकर व गीताली महेंद्र मातोंडकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रण अभिजित पाटील, यंत्र अभियंता प्रशांत वासकर, परीक्षक श्यामसुंदर नाडकर्णी, सुरेंद्र खामकर, गीताली महेंद्र मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सहायक यंत्र अभियंता संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.नाट्यस्पर्धेची ही प्राथमिक फेरी यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहनचे वरिष्ठ लिपिक पंकज कासार, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, सहायक यंत्र अभियंता संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. रत्नागिरी विभागातील नाटकासाठी वामन जाेग, गणेश जाेशी, अनिकेत आपटे, रामदास माेरे यांनी सहाय केले.

उत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम क्रमांक : राजेश मयेकर (रत्नागिरी विभाग, नाटक : किनारा), द्वितीय क्रमांक विजय सूर्यवंशी (सातारा विभाग नाटक- आईबाबा आणि ती).उत्कृष्ट नेपथ्य व रंगमंच व्यवस्था प्रथम : राजू थोरात, सुशील कांबळे, सागर पाटणकर (सातारा विभाग-नाटक आईबाबा आणि ती), द्वितीय क्रमांक : प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर (रत्नागिरी विभाग-नाटक किनारा).उत्कृष्ट अभिनय पुरुष : प्रशांत आडिवरेकर, स्त्री : श्रद्धा मयेकर (रत्नागिरी विभाग-नाटक किनारा).अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके : मारुती तोरबाळे (कोल्हापूर विभाग), संदीप कोळी (सांगली विभाग), अंकुश लोहकर, अनिता शिंदे (सातारा विभाग).

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी