लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्र अनिवार्य केले आहे. ज्यांचे छायाचित्र नसेल त्यांना ते ५ एप्रिलपर्यंत देण्याची डेडलाइन दिली आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदार संघातील मतदार याद्या छायाचित्रासह अद्ययावत असून, त्यातील १३ लाख १५ हजार १८६ मतदारांची छायाचित्रे उपलब्ध आहेत. १०० टक्के मतदारांची छायाचित्रे असलेला रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा ठरला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. या पाचही मतदार संघात मिळून एकूण मतदार संख्या १३ लाख १५ हजार १८६ इतकी आहे. यापैकी महिला मतदारांची संख्या ६ लाख ८२ हजार ९५०, पुरुष मतदार ६ लाख ३२ हजार २२४ आणि तृतीयपंथी यांची संख्या १२ आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्या मतदारांच्या छायाचित्रासह अद्ययावत करण्याचे निर्देश यापूर्वीही दिले होते. आता पुन्हा यासाठी ५ जुलैची अंतिम मुदत देण्यात आली असून, ज्यांची छायाचित्रे नसतील अशांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत; मात्र रत्नागिरीतील पाचही विधानसभा मतदार संघातील सर्वच मतदारांची म्हणजेच १३ लाख १५ हजार १८६ मतदारांच्या छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत केली आहे.
पाचही विधानसभा मतदार संघाच्या याद्या अद्ययावत
निवडणूक आयोगाने मतदार यादीत मतदाराचे छायाचित्र अनिवार्य केले आहे. त्यासाठी मतदाराला त्याचे छायाचित्र निवडणूक आयोगाकडे ५ जुलै २०२१ पर्यंत जमा करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत छायाचित्र जमा न केल्यास त्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे; मात्र रत्नागिरीतील उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या नियोजनबद्ध कार्यप्रणालीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाचही मतदार संघातील एकूण १३ लाख १५ हजार १८६ मतदारांच्या छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीतून नावे वगळण्याचा धोका कुठल्याही मतदाराला नाही.
१८ ते १०० वयोगटातील मतदारांची छायाचित्रे
जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील २४,०५५ तर २० ते २९ वयोगटातील २,२८,८९९ आणि ३० ते ३९ वयोगटातील २,५६,८२८ एवढे मतदार आहेत.
४० ते ४९ वयोगटातील २,८१, ६१५, ५० ते ५९ मधील २,१९,०७५, ६० ते ६९ मधील १,५३,३७६ आणि ७० ते ७९ वयोगटातील ९८,१३८ मतदार आहेत.
८० ते ८९ वयोगटातील ४४,९८४, ९० ते ९९ मधील ७८०५ आणि १०० आणि त्यावरील वयोगटातील ४११ मतदार आहेत.
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांवर मतदारांचे छायाचित्र अनिवार्य केले आहे. छायाचित्र नसणाऱ्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याच्या सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाचही विधानसभा मतदार संघातील एकूण १३ लाख १५ हजार १८६ मतदारांच्या छायाचित्रासह मतदार याद्या याआधीच अद्ययावत झाल्या आहेत.
- सुशांत बनसोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी.
डमी ८६९