शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:36 IST

रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाºयांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे- मिशन बंधारे - उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ बंधाºयांच्या पाण्यावर पिकविला जातो भाजीपालाबंधारे उभारण्यासाठी शासनाची दमडीही खर्च केली जात नाहीवनराई, विजय, कच्चे ओहोळ, नाल्यांमधील आटू लागले पाणीलोकसहभागातून उभारले जाताहेत बंधारे.

रत्नागिरी : जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ८४५० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे.जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याच्या मोहिमेचा दोन महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. 

बंधारे उभारण्यासाठी खासगी कंपन्यांनी जिल्हा परिषदेला साहित्याचा पुरवठा केला आहे. त्यामुळे शासनाचा एकही पैसा खर्च न करता खासगी कंपन्यांकडून देण्यात आलेल्या साहित्याचा वापर काही ठिकाणी बंधारे उभारण्यासाठी करण्यात येत आहे.दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३६६९ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्याला १०१० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना केवळ २४५ बंधारे पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याला १३०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना ४४१ बंधारे उभारण्यात आलेले आहेत. 

दापोली तालुक्याला १०६० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ७४२ बंधारे उभारले आहेत. अशा प्रकारे बंधाऱ्यांची कामे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावे, वाड्यांवर सुरु आहेत. या बंधाऱ्यांमध्ये वनराई बंधारे - ८००, विजय बंधारे - ११३६ व कच्चे बंधारे - १७३३ अशी वर्गवारी आहे.या बंधाऱ्यांच्या पाण्यावर दरवर्षी भाजीपाला निर्मिती करुन उत्पन्न घेण्यात येते. त्यामुळे बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकरी आर्थिक फायदा घेतात. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने त्यामुळे तेथे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते.

जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ओहोळ, नाले, नद्या नसल्याने त्या ग्रामपंचायती बंधारे कुठे उभारणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे पाणी आटण्याच्या स्थिती असल्याने बंधाऱ्यांची उद्दिष्टपूर्ती होणे अशक्य आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार