शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मामाच्या लग्नातच उरकणार भाच्याची मुंज? - प्रचाराचा जोम वाढतोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:16 IST

येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही

ठळक मुद्दे-‘लोकसभे’तच ‘विधानसभे’ची रंगीत तालीम?

रत्नागिरी : येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही विधानसभेच्या छुप्या प्रचारासाठीची मोठी संधी ठरत आहे. भावी उमेदवार म्हणून मैदानात उतरू पाहणारे अनेकजण लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेचा प्रचार छुप्या रितीने करीत आहेत. लोकसभा प्रचार सभांमधूनही विधानसभेच्या उमेदवारीची इच्छा जाहीररित्या व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ‘मामाच्या लग्नात भाच्याची मुंज’, या म्हणीचा प्रत्यय जनतेला येत आहे. 

 

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या स्थितीत सर्वच राजकीय पक्षांमधील विधानसभा उमेदवारीला इच्छुक असलेल्यांनी उचल खाल्ली आहे. लोकसभेचा प्रचार करताना वरिष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या उमेदवारीचे पान लावून घेण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. तसेच काही इच्छुक प्रचार सभांच्या व्यासपीठावरून आपल्या उमेदवारील आशीर्वाद मागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगत आमच्याकडेही लक्ष ठेवा, असे सांगत आहेत.  

 

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होती. मात्र, नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. यावेळीही लोकसभेला युती झाली आहे. मात्र, येत्या दिवाळीच्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही युती टिकेल की नाही, याबाबत आतापासूनच शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे युती झाली तर काय व नाही झाली तर काय स्थिती असेल, यावरून विधानसभेच्या उमेदवारीची गणिते मांडली जात आहेत. जशी युतीमध्ये स्थिती आहे, तशीच कॉँग्रेस आघाडीमध्ये स्थिती आहे. त्यामुळे युती व कॉँग्रेस आघाडीमध्येही लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या उमेदवारीची व विजयाची शक्यता पडताळून घेतली जात आहे. 

 

विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास रत्नागिरी व गुहागर हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येणार आहेत. अन्य तीन मतदारसंघ  शिवसेनेच्या वाटणीला जाणार आहेत. चिपळूणमध्ये सेनेचे सदानंद चव्हाण, रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत, राजापूरमध्ये सेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत, तर गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व दापोलीत  राष्ट्रवादी चे संजय कदम हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हे आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

 

गुहागरमधून भाजपकडून विनय नातू यांच्या नावाची चर्चा आहे. चिपळूणमध्ये  राष्ट्रवादीतर्फे शेखर निकम यांनी उमेदवार म्हणून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार प्रसाद लाड यांचे नाव रत्नागिरीतून चर्चेत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ मानेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राजापूरमध्ये अजित यशवंतराव हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

 

प्रचाराची रणधुमाळी

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार शिवसेना, भाजप, रासप व रिपाइं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे या मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसचाही प्रचार सुरू झाला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रचार सभा अद्याप दिसून येत नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग