शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

रत्नागिरीकरांना प्रांताधिकाऱ्यांची ३ महिने प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2016 00:44 IST

तीन महिन्यानंतरही अधिकारी नाही : जातीचे, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा करताना होतेय कसरत

रत्नागिरी : रत्नागिरीच्या प्रांताधिकारीपदी कार्यरत असलेले प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या बदलीला आता तीन महिने होत आले तरी अजूनही त्यांच्या पदावर नियुक्ती न झाल्याने रत्नागिरी व संगमेश्वरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक प्रवेशासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सहीनिशी आवश्यक असणारे जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा होताना कसरत करावी लागत आहे.रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात नाशिक येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड रत्नागिरीत आल्यानंतर त्यांच्याकडे मे महिन्यात या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याही प्रशिक्षणाची मुदत संपल्याने ते पुढील प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही जबाबदारी हजारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे चिपळूणचाही पदभार असल्याने ते रत्नागिरीत आल्यानंतर दाखल्यांवर सह्या होत आहेत.सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी मुलांची आणि पालकांची विविध दाखल्यांसाठी पळापळ सुरू आहेत. नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या सहीने मिळणारे दाखले चटकन मिळत आहेत. मात्र, जातीच्या तसेच नॉन क्रिमीलेअर, आदी दाखल्यांवर प्रांताधिकारी यांचीच सही आवश्यक असल्याने हे दाखले मिळण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्यातच चिपळूण प्रांताचा कार्यभार सांभाळतानाच रत्नागिरीचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. रत्नागिरी आणि चिपळूण ही दोन्हीही कार्यक्षेत्रे मोठी असल्याने प्रांताधिकारी हजारे यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिपळूण येथील महत्वाच्या सुनावणी, निर्णय मार्गी लावतानाच रत्नागिरीतील कामाचा आवाका सांभाळावा लागत आहे. त्यातच आता दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचीही धावपळ झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडील कामांचे महत्व लक्षात घेऊन हजारे यांना आठवड्यातील काही दिवस रत्नागिरीला द्यावे लागत आहेत. यामुळे कामांचा निपटारा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेले तीन महिने रत्नागिरीला नवीन प्रांताधिकारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. रत्नागिरीकर नव्या प्रांताधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ सुरू आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले जमा करावे लागत आहेत. प्रांत कार्यालयात या दाखल्यांसाठी गर्दी होत असून, प्रांताधिकारी नसल्याने या दाखल्यांचा निपटारा होत नाही.