शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : राजापुरातील वेत्ये समुद्रात मच्छिमारी बोटीला जलसमाधी, सातजणांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:00 IST

राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.

ठळक मुद्देराजापुरातील वेत्ये समुद्रात मच्छिमारी बोटीला जलसमाधीसातजणांना वाचविण्यात यश

राजापूर : तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.समुद्रात बुडालेली बोट तुळसुंदे येथील असून, ती महालक्ष्मी या नावाची होती. तुळसुंदेमधील नितीन देवकर हे बोटीचे मालक आहेत. त्यांच्या समवेत जगदीश शिरगावकर, पुरुषोत्तम नाटेकर, कुंदन आडिवरेकर, भिकाजी आडिवरेकर, संजय पावस्कर व मारुती खडपे असे सातजण सोमवारी तुळसुंदे बंदरातून समुद्रात मच्छिमारीसाठी निघाले होते.

सकाळी सातच्या दरम्यान त्यांची बोट किनाऱ्यापासून साधारणपणे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आली असता अचानक जोरात वारा वाहू लागला. त्यानंतर काही क्षणातच बोटीच्या तळाची लाकडी फळी फुटून आता पाणी भरु लागले व बोट समुद्रात हेलखावे खावू लागली.अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे बोटीवरील मालकासह अन्य सहाजण गोंधळून गेले. त्यांनी जोरदार आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी बुडत असलेल्या बोटीपासून आजुबाजुलाच काही अंतरावर सात ते आठ बोटीदेखील समुद्रात मच्छिमारीसाठी चालल्या होत्या. त्यावर असलेल्या मच्छिमारांनी खलाशांचा गोंधळ पाहिला आणि ते त्याठिकाणी पोहचले. त्यांनी दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या सातही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.मात्र, लाकडी फळी तुटल्याने त्या बोटीला जलसमाधी मिळाली. या घटनेमध्ये नितीन देवकर यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे निरीक्षक कानसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार