शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:26 IST

समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

दापोली : समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.पत्रकारांशी बोलताना कदम पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षापासून कोयनेच्या समुद्र्राकडे वाहून जाणाºया पाण्याचा उपयोग कोकणाचे नंदनवन होण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करत होतो. मध्यंतरीच्या काळात कोयनेचे हे पाणी मुंबईकडे नेण्याचा घाटही घालण्यात आला होता. मात्र आपण त्याला तीव्र विरोध केला होता.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा विषय पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. सध्या राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने या योजनेच्या खचार्साठी खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मागणी करण्यात यावी व या प्रस्तावाचा पाठपुरावा सचिवांनी करावा असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली.हे पाणी उचलल्यास कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. कोकणच्या विकासासाठी केंद्राकडे पाठविण्यात येणारा हा पहिलाच प्रस्ताव आहे, असेही ते म्हणाले.सीआरझेडबद्दल ते म्हणाले की, पूर्वी किनारपट्टीच्या भरतीरेषेपासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सीआरझेड कायद्?यामुळे परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे कोकणाला विस्तीर्ण असा समुद्र्रकिनारा लाभूनही त्याचा उपयोग पर्यटनासाठी करता येत नव्हता व त्यामुळे कोकणचा विकास थांबला होता. आपण पर्यावरण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर सीआरझेड कायद्यात शिथिलता आणण्यासाठी चार वर्षे केंद्र सरकारकडे प्रयत्न केले. तेथील मंत्रालयात जाऊन ठाण मांडून बसलो. त्यामुळे या कायद्यात शिथिलता आणण्यात आली.

आता ही मर्यादा ५० मीटर अंतरापर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे कोकणात आता पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे हाती घेता येणार असून आता कोकणचा विकास होण्यास निश्चित मदत होणार आहे. यामुळे कोकणातील तरुणांच्या हाताला गावातच काम मिळेल व मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबविण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRatnagiriरत्नागिरी