शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:36 IST

रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते.

ठळक मुद्देरत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभागमांडवी, भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनावेळी संस्था कार्यरत

रत्नागिरी : शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. अनंत चतुर्दशीला शहरातील मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो.यावर्षी भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते.

गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाऱ्यावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते. शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, स्काऊट गाईड, हरित सेना पथक, फिनोलेक्स महाविद्यालय, जिद्दी माऊंटेनिअर्स तसेच नगर पालिकेचे कर्मचारी मिळून २५० मंडळी स्वच्छता उपक्रमात सहभागी झाली होती. स्वच्छता मोहिमेसाठी यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिद्द माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष धीरज पाटकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.निर्माल्यापासून खतरत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावर एक टन, तर भाट्ये किनाऱ्यांवर ३०० किलो मिळून सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. त्याचबरोबर गौरी गणपती विसर्जनावेळी मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले होते. भाट्ये येथील प्रादेशिक नारळ रोपवाटिका केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. त्यामुळे निर्माल्य तेथे देण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनRatnagiriरत्नागिरी