शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचे सूप वाजले!

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

वन्समोअरच्या नाऱ्याने सांगता : रत्नागिरीभूषण पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्राने सन्मान

चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ची सांगता वन्समोअरच्या नाऱ्याने उत्साही वातावरणात सुदेश भोसले यांच्या बहारदार मैफलीने झाली. संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण यांनी पुन्हा एकदा हा महोत्सव चिपळूणमध्ये भरवावा, अशी वन्समोअरची मागणी केली व हा महोत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कलाकार, कर्मचारी व नागरिकांना धन्यवाद दिले.रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची सांगता सोमवारी रात्री झाली. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, या महोत्सवाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया वन्समोअरच्या आहेत. गावागावात चर्चा सुरु आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हा कार्यक्रम चिपळूणला दिला, त्यामुळे चिपळूणकरांचा आनंद गगनाला मिळाला. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. प्रशासनाने एवढी मोठी जबाबदारी पार पाडली. सर्वांनी प्रचंड उन्हात जबाबदारी ओळखून काम केले. पोलिसांनीही चांगले सहकार्य केले. हा परिवर्तनाचा ‘न भुतो न भविष्यती’ असा कार्यक्रम झाला. सर्व पक्षांच्या लोकांनी चांगली साथ दिली. त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच, अशी कृतज्ञता आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली. खासदार विनायक राऊत म्हणाले, पालकमंत्र्यांनी चिपळूणकरांची इच्छा पूर्ण केली आहे. लोकभावनेची जाण असलेले शासन आणि पालकमंत्री हे एकत्र आल्यावर काय घडते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण कोकणाला अभिमान वाटावा, असा महोत्सव भरवून चिपळूणकरांना चांगली संधी दिली. असे महोत्सव वारंवार झाले पाहिजेत, असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र वायकर व खासदार विनायक राऊत यांचा आमदार चव्हाण यांनी सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांचा सत्कार स्वागत समिती अध्यक्ष जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केला. नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, माजी महापौर श्रध्दा जाधव यांचा सत्कार तहसीलदार वृषाली पाटील यांनी केला. दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, ग्लोबलचे राम रेडीज, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रकाश सावंत व पोलीस अधिकारी यांचा सत्कार पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते करण्यात आला. ग्लोबल चिपळूण व विविध संस्थांतर्फे पालकमंत्री वायकर व आमदार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री वायकर यांनी रत्नागिरी भूषण पुरस्कार प्राप्त २० मान्यवरांचा पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ११ हजार रुपये रोख देऊन गौरव केला. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात प्रबोधनकार ठाकरे कलादालन व त्यांचे तैलचित्र उभारण्यासाठी पालकमंत्री वायकर यांनी १ लाख रुपयांची देणगी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली. सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. (प्रतिनिधी)पर्यटन महोत्सवात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम गोलमडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, सचिन कदम व्यासपीठावर उपस्थित होते.