शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : तेर्ये बुरंबीत श्वानाने घेतला पाचजणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:59 IST

संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी गावात एका पिसाळलेला श्वानाने पाचजणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम तेर्ये ग्रामपंचायतच्यावतीने रबविली जात आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे तेर्ये बुरंबीत श्वानाने घेतला पाचजणांना चावाश्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी गावात एका पिसाळलेला श्वानाने पाचजणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम तेर्ये ग्रामपंचायतच्यावतीने  राबविली जात आहे.तेर्ये बुरंबी येथील हा शिकारी श्वान होता. कातकरी समाजातील एका कुटुंबाने पाळला होता. हा श्वान आता पिसाळला आहे. तेर्ये मधलीवाडीतील वेदा प्रमोद भरवणे (७) ही अंगणात खेळत असताना तिच्या पायाला व कंबरेला दोन ठिकाणी चावा घेऊन नखाने ओरबाडून जखमी केले तर बाब्या मुंगु गुरव (७५, टाकेवाडी), निशा राजू पंडीत (२५, बुरंबी) याबरोबरच ग्रामस्थ धावडे (६५, मुचरी धावडेवाडी) यांना चावा घेउन जखमी केले आहे.या चार जणाना बुरंबी प्राथमिक आरोग्य केद्र्रात प्राथमिक उपचार आणि पहिला डोस देऊन रत्नागिरीच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले आणि अत्यावश्यक असलेला इनिनोग्लोबीन लसीचा डोस देण्यात आला. त्यांना उर्वरीत चार डोस बुरंबी आरोग्य केंद्रात देण्यात येणार असल्याची महिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांनी दिली.

याच श्वानाने कुळयेवाशीतील सखाराम सदाशिव गावडे (६५ ) यांनादेखील चावा घेउन जखमी केले. त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगमेश्वर येथील अन्कुर प्रमोद कास्टे यांना त्यांच्याच घरातील श्वानाने चावा घेतला. त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तेर्ये गावातील पिसाळलेल्या या शिकारी श्वानाचा ग्रामपंचायतीच्यावतीने बंदोबस्त करण्यात येत आहे. तरुणांची एक टोळी या श्वानाला मारण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहेत. दरम्यान संगमेश्वर, देवरुख शहरासह साडवली परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसुन येत आहे.

टॅग्स :dogकुत्राRatnagiriरत्नागिरी