शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: पेठमाप-मुरादपूर पूलही अडकला राजकीय वादात

By अरुण आडिवरेकर | Updated: October 20, 2022 18:24 IST

याप्रश्नी दोन माजी उपनगराध्यक्ष आमने-सामने आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चिपळूण: शहरातील वाहतूकदारांसाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणारा मुरादपूर व पेठमाप रस्ता अर्थात जुन्या कोयना रस्त्यावर पूल उभारण्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. अशातच हा पूल आतापासूनच वादात सापडला आहे. याप्रश्नी दोन माजी उपनगराध्यक्ष आमने-सामने आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही दिवसांपूर्वी माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी, मुरादपूर या फाट्यावर वाशिष्ठी नदीचा नाईक कंपनीकडे जाणारा प्रवाह बंद करण्यासाठी काढलेला गाळ टाकून पाणी अडवले आहे. या ठिकाणी नगर परिषद बांधत असलेला ११ कोटींचा नवीन पूल बांधण्याची गरज लागणार नाही. या पुलावर होणारा खर्च स्वागत हॉटेलसमोरून खेड कोलेखाजनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिव नदीवर पूल बांधल्यास शहरातील ३० टक्के वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यामुळे हा पूल निधी असूनही इतर मटण मार्केट, भाजी मंडई, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या प्रकल्पांप्रमाणे वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शहरात पेठमाप येथून मुरादपूर महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जुना कोयना रस्ता आहे. कोळकेवाडी धरणातील विद्युत निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी खूप वेगाने येत असल्याने शिव नदीतून येणाऱ्या पाण्याला अडवते, परिणामी शहरात पाणी भरते. समुद्रातील भरती आणि जगबुडीचे पाणी हे सगळे मुद्दे थोड्या प्रमाणात महापुराला कारणीभूत असले, तरी चिपळूण शहराची दिशाभूल करणारे आहेत. कोळकेवाडी धरणातील विद्युत निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी खूप वेगाने येत असल्याने हे पाणी जर या फाट्यावर नदीतीलच काढलेला गाळ टाकून अडवले, तर शहरात येणारा महापूर येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पेठमाप- मुरादपूर पूल केल्यास भविष्यात चिपळूण शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पेठमाप, गोवळकोट भागातील नागरिकांसाठीच नव्हे तर मार्कंडी, बहादूरशेख नाका, मुरादपूर, वाणीआळीतील जाणाऱ्या वाहतूकदारांच्या दृष्टीनेही पर्यायी रस्ता म्हणून उपयोग होणार आहे. या पुलाची मागणी उपनगराध्यक्ष असतानाच मी नगर परिषदेकडे २०१४ मध्ये केली होती. त्याप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे; परंतु आता काहीजण या कामात राजकारण करू पाहत आहेत. - लियाकत शाह, काँग्रेस शहराध्यक्ष, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी