शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सोनोग्राफी सेंटर्सची दर तीन महिन्यांनी पाहणी होणार, कडक अंमलबजावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:56 IST

लिंगभेद प्रतिबंध कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देलिंगभेद प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रशासन कठोर पावले उचलणार निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांची माहिती

रत्नागिरी : लिंगभेद प्रतिबंध कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने माहिती देताना ते म्हणाले, जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर कमी होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन लिंगभेद प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून जिल्ह्यातील मान्यताप्राप्त १०५ सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात येणार आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकाच्या सहाय्याने सहा महिन्यांनी या सेंटर्सना अचानक भेट देऊन नोंदीवहीत नियमित नोंदी केल्या जात आहेत ना, तसेच कुठलाही गैरप्रकार होत नाही ना, या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने आता ही बाब गांभीर्याने घेतली असल्याने काही सेंटरमध्ये गैरप्रकार होत असतील तर त्याला १०० टक्के आळा नक्कीच बसेल, असा विश्वास घोरपडे यांनी व्यक्त केला.माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी ट्रक टर्मिनलबद्दल लोकशाही दिनात आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यासाठी २०० गुंठ्यांपैकी १६० गुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या चार जागांपैकी एक जागा उड्डाण पुलात जात असल्याने उर्वरित जागा पुरेशी नसल्याचा आक्षेप शेट्ये यांनी नोंदवला आहे.रत्नागिरी रेल्वे स्टेशन जंक्शनवर उभारलेली टपरी अनधिकृत असल्याने ती हटवावी, तसेच निवडणुकीवेळी ताब्यात घेतलेले शस्त्र अद्याप पोलीस विभागाकडून देण्यात आलेले नाही, अशी तक्रारही लोकशाही दिनात करण्यात आली आहे.

यांसह एकूण २९ तक्रारी लोकशाही दिनात दाखल झाल्या असून, चार तक्रारी फोनवरून स्वीकारण्यात आल्या. यात महसूल विभाग ८, जिल्हा परिषद ६, नगरपालिका प्रशासन ५, पोलीस २, महावितरण २, जिल्हा उपनिबंधक, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), लघुपाटंबधारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याविषयी प्रत्येकी एका तक्रारीचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाचे एस. टी.ला आदेशलांजा येथील दोन दिव्यांग मुलींसाठी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तिंना सवलत देण्यास एस. टी.ने नकार दिला आहे. याबाबत लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यात आली. या दोन्ही मुलींपैकी एक १०० टक्के आणि दुसरी ९० टक्के अपंग आहे. त्यामुळे त्यांना प्रवास करताना मदतनिसाची गरज लागणार आहे.

ही बाब लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तिंना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींनुसार या दोन्ही मुलींसोबत प्रवास करणाऱ्या मदतनिसांनाही प्रवास सवलत देण्यात यावी, असा आदेश जिल्हा प्रशासनाने एस. टी. प्रशासनाला दिला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल