शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:48 IST

सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथमरत्नागिरी जिल्हा : ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

रत्नागिरी / पाचल : सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने ग्रामपंचायतीला भेट देऊन केलेल्या गुणांकानुसार पाचल ग्रामपंचायतीला स्वच्छतेत १४, व्यवस्थापनात १८, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणात २० पारदर्शकता व पर्यावरणात ९ असे एकून ७३ गुण मिळाले.या ग्रामपंचायतीला यापूर्वी निर्मळ ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, स्वच्छता भारत मिशनअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्मार्ट ग्राम पाचलमधील सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्य विभाग, पाचल हायस्कूल, खापणे महाविद्यालय, पोलीस स्थानक, महावितरण कंपनी, सर्व बचत गट, सहकारी सेवा सोसायट्या आदींनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

स्मार्ट ग्रामसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिध्दार्थ जाधव, विनायक सक्रे, शंकर पाथरे, पूर्वा पाथरे, रजिया गडकरी, विजया तेलंग, श्रध्दा जाधव, मनीषा बेर्डे, तेजल सुतार यानी सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी