शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:56 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान झाले. मतदानाचा उत्साह सायंकाळच्या वेळेत जास्त वाढेल असा अंदाज आहे, दुपारपर्यंत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही.

ठळक मुद्देरत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३५.६९ टक्के मतदानकोठेही मतदान यंत्रात बिघाड नाही

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान ४५.१० टक्के मतदान झाले.  मतदानाचा उत्साह सायंकाळच्या वेळेत जास्त वाढेल असा अंदाज आहे, दुपारपर्यंत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही.

सिंधुदुर्गात ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान

 सिंधुदुर्गनगरी, ता.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दु. ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के एवढे मतदान झाले आहे. ६ लाख ६६ हजार ७२० मतदारांपैकी ३ लाख ३४ हजार ४५१ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १ लाख ७३ हजार ६६६ पुरुष व १ लाख ६० हजार ६८५ महिला मतदारांनी मतदान केले आहे. अजून दोन तास शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित ५० टक्के मतदारांपैकी किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात यावर जिल्ह्याच्या एकूण मतदानाची टक्केवारी निश्चित होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भर दुपारीही मतदार बाहेर येऊन मतदान करत आहेत.  दुपार १ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान झाले.११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. ११ वाजल्यानंतरही मतदानासाठी उत्तम प्रतिसाद लाभला आहे.सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.निवडणूक निरिक्षक  के.मजुनाथ यांनी सावंतवाडीतील दोन मतदान केंद्राना भेटी देत आढावा घेतला. 

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरुवातीला वेग थोडा कमी होता मात्र ८ ते १० यादरम्यान मतदानाचा वेग चांगला झाला. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात ३५.६९ टक्के मतदान झाले होते. मतदान यंत्रांत बिघाड झाल्याचे अजून कोणतेही वृत्त नाही.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे समीर तुकाराम हरपले या तरुणाचा मंगळवारी विवाह होता. त्याने विवाहाला जाण्यापूर्वी मतदानाचा अधिकार बजावला. तसेच दापोली तालुक्यातील जालगाव येथे सुप्रिया गुरव या तरुणीनेही मतदानाला जाण्यापूर्वी मतदान केले. खास महिलांसाठी सुरु करण्यात आलेली सखी मतदान केंद्रे मंगल कार्यक्रम असल्याप्रमाणे नटलेली होती. लग्नाचा असतो तसा मंडप, रांगोळी, फुग्यांची सजावट असलेली कामं असा आगळा थाट सखी मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता.

चिपळूण मध्ये दुपारी १ वाजेपर्यंत  ३४ टक्के  मतदान झाले आहे. दापोली विधानसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३८.३४ टक्के  मतदान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दु.१ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान झाले.११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. ११ वाजल्यानंतरही मतदानासाठी उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उर्वरित चार तासामध्ये किती मतदान वाढतेय यावर एकूण मतदान किती होणार, हे निश्चित होणार आहे.

वेंगसर येथे तब्बल दीड तास इव्हीएम मशिन बंद

वैभववाडी : तालुक्यात १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. तर वेंगसर येथे मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल दीड तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तालुक्यात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.     तालुक्यात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे. कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आला आहे. उन्हामुळे सकाळच्या वेळात मतदान उरकण्यासाठी घाई दिसून येत होती.

रायगड मतदारसंघात अंदाजे सरासरी मतदान दुपारी 1 पर्यंत ( 37.77%)

  • पेण 38.5%
  • अलिबाग 39.38%
  • श्रीवर्धन 37.10%
  • महाड 39.7%
  • दापोली 34.26%
  • गुहागर 37.40%
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग