शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  विद्यार्थी मारहाणप्रकरणी सेंट थॉमस स्कूलच्या समर्थनार्थ पालकांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:03 IST

शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या अरेरावीला विरोध करण्यासाठी शहरानजिकच्या कारवांची वाडी येथील सेंट थॉमस स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सकाळी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून अशा घटनांबाबत निषेध व्यक्त केला. यात तीनशेहून अधिक पालक सहभागी झाले होते. ​​​​​​​

ठळक मुद्दे सेंट थॉमस स्कूलच्या समर्थनार्थ पालकांचा मूक मोर्चारत्नागिरी विद्यार्थी मारहाणप्रकरणी

रत्नागिरी : शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या अरेरावीला विरोध करण्यासाठी शहरानजिकच्या कारवांची वाडी येथील सेंट थॉमस स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सकाळी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून अशा घटनांबाबत निषेध व्यक्त केला. यात तीनशेहून अधिक पालक सहभागी झाले होते.शहरानजिकच्या कुवारबाव येथील सेंट थॉमस इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थी निहार दिलीप मांगले या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्याचा जाब विचारण्यासाठी काही संस्थांचे कार्यकर्ते व पालक हे या शाळेत जाऊ थडकले. यापैकी काहींनी या शाळेचे प्राचार्य व इतर शिक्षकांना धक्काबुक्की करत, शिविगाळ करून धमकी दिल्याची तक्रार या शाळेतीलच काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

शाळांमध्ये होणाऱ्या या अरेरावीच्या घटनांना पायबंद होण्यासाठी या शाळेच्या काही विद्यार्थ्यांचे पालक यांनी आवाहन केल्यानुसार इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक पालकांनी एकत्रित आज सकाळी मूक मोर्चा काढला.या मूक मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी या मोर्चाची सांगता झाली. शाळांमध्ये होणाऱ्या या गैरप्रकारांना आळा बसावा, अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार विजय दांडेकर यांनी हे निवेदन स्वीकारले.

शाळांमध्ये असे प्रकार घडले तर तिथले शिक्षक भीतीच्या छायेखाली काम करतील. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही घसरेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे. याबरोबरच सोशल नेटवर्क वरून भावना भडकवणाºयांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी या पालकांकडून करण्यात आली.

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी