शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:45 IST

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देबंदर विभागाच्या आदेशाने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातप्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ऐन परीक्षा काळात या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अडचणीचा ठरणार आहे.भातगाव - करजुवेसह संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना भातगाव खाडीतून नौका बोट हा एकमेव पर्याय आहे. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आहे. यामुळे भातगाव - करजुवे याठिकाणी कोणतीही वैद्यकीय सुविधा तसेच उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.

इथल्या प्रत्येकाला रोजगारासाठी अथवा शासकीय कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय आहे. याठिकाणी आजारी व्यक्तीला उपचारांसाठीही होडीतूनच माखजन, डेरवण अथवा अन्यत्र घेऊन जावे लागते. याठिकाणी पूल नसल्याने होडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने साऱ्यांसाठीच अडचण निर्माण झाली आहे.सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणांहून १०वी, १२वीतील सुमारे ६० विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र, अचानक येथील होडी बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होणार आहे. दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाल्या आहेत.

या परीक्षांना होडी बंदच्या निर्णयामुळे मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत होडी चालकांशी संपर्क साधला असता, बंदर विभागाच्या अटींची पूर्तता केली आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळाल्यास पूर्ण करणार असल्याचे सांगितले.येथील नौकाचालक हे निरक्षर असून, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांनी होडी सुरु ठेवली होती. परंतु अचानक आलेल्या बंदर विभागाच्या पत्रामुळे सध्या ही होडी बंद ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater transportजलवाहतूक